
आंबा पिकाच्या औषध निर्मितीसाठी रत्नागिरीत रिसर्च सेंटर करण्याची मागणी
आंबा व्यवसाय आतबट्ट्याचा होत असून कीडरोगांच्या फवारणीचा खर्च वर्षाला १२ ते १५ लाख रुपयांच्या घरात जातो. औषध फवारण्याने तुडतुडाही मरत नाही. अपेक्षित उत्पन्न न आल्याने उत्पादकांची बिकट परिस्थिती होते. यासाठी आंब्यावरील रोगांना पुरक औषधे निर्मितीसाठी कापूस, द्राक्षाप्रमाणे रिसर्च सेंटर रत्नागिरीत व्हावे, अशी मागणी आंबा बागायतदारांनी केली आहे.
जिल्हा परिषदेतील शामराव पेजे सभागृहात झालेल्या पणन, अपेडा व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निर्यातक्षम आंबा उत्पादन व निर्यात या विषयावरील कार्यशाळेत बागायतदार बोलत होते.
www.konkantoday.com