चिपळूण तालुक्यात ३५ वाड्या तहानलेल्या

चिपळूण ः तालुक्यातील तहानलेल्या १४ गावांतील ३५ वाडयांवर टँकरची फूंकर मारून पाणी टंचाईची झळ कमी करण्याचा प्रयत्न सरकाकडून करण्यात येत आहे. तालुक्यातील शिरवली, रिक्टोली, तिवंडी, कोंडमळा, नांदगांव खुर्द, कळकवणे, ओवळी, गाने, कामथे खुर्द, वालोटी, कादवड, नांदिवसे, आकले, अडरे अशा १४ गावांना आणि ३५ वाडयांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. केवळ एका टँकरच्या सहाय्याने येथे पाणी पुरवठा केला जात आहे. आजही येथे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
तालुक्यातील पाणी टंचाई सध्या तीव्र झाली आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. सध्या ३७ ते ४० अंश सेल्सिअस तापमान आहे. वाढत्या उष्म्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत असतात. घाबाहेर पडणेही अवघड झाले आहे. पाणी टंचाई असल्याने मिळेल तिथून पाणी आणण्यासाठी कसरत येथील ग्रामस्थांना करावी लागत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पं.स.तर्फे टंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला जातो. यावर्षीही प्रशासनातर्फे पाणी पुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button