अद्वैत पेट्रोल पंप रत्नागिरी येथे ५० हजार रुपयांची चोरी

रत्नागिरी ः पेट्रोलपंपावरील लॉकरमध्ये ठेवलेली ५० हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याप्रकरणी कॅशिअरविरोधात शहर पोलीस स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार सुनिल शेठ (रा. वाराणसी, उत्तरप्रदेश) हे श्री. कोमलसिंग यांच्या मालकीच्या माळनाका येथील पेट्रोल पंपावर कॅशिअर म्हणून कामाला आहेत. लॉकरमध्ये ठेवलेली ५० हजार रुपयांची रक्कम त्यांनी चोरीच्या उद्देशाने चोरून नेली, अशी तक्रार करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात ब्रह्मप्रताप नारायण सिंग यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी सुनिल शेठ यांच्याविरोधात भा. दं. वि. क. ३८१, अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

Related Articles

Back to top button