आता भाजप ‘तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे व्हॅक्सीन देगें’ असा नारा देत असल्याचा संजय राऊत यांचा टोला

कोरोनाची लस केवळ भाजपशासित राज्यांमधील नागरिकांनाच मोफत मिळणार का, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला. आम्ही शाळेत असताना पाठ्यपुस्तकात ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ अशी घोषणा वाचली होती. त्याप्रमाणाचे आता भाजप ‘तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे व्हॅक्सीन देगें’ असा नारा देत असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला.
भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये आमची सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची मोफत लस देऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपला खडे बोल सुनावले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button