नाचणे येथे पेट्रोल ओतून जाळून घेणार्‍या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : नाचणे येथे आजारपणाला कंटाळून पेट्रोल अंगावर ओतून स्वतः ला जाळून घेणार्‍या महिलेचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथे बुधवारी 5 रोजी मृत्यू झाला. साक्षी संजय कुवेस्कर (वय 35, रा. नाचणे सुपलवाडी, रत्नागिरी) असे तिचे नाव आहे. ती गेल्या 8 ते 10 वर्षांपासून अस्थम्याच्या आजाराने त्रस्त होती. पेट्रोल  ओतून पेटवून घेतल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button