
खेडमध्ये १९ वर्षीय युवतीची गळफासाने आत्महत्या
खेड : शहरातील कुंभार वाडा एकविरा नगर येथे एका १९ वर्षीय युवतीने आत्याच्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघड झाली. प्रकरणी सीताराम शांताराम मोरे यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
पल्लवी सीताराम मोरे असे त्या आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. रविवारी तिने आत्या वत्सला महादेव सकपाळ यांच्या घराच्या किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या