
नागरिकांच्या तक्रारींनंतर मुंबईतून ‘क्लीन अप मार्शल्स’ हद्दपार
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ‘स्वच्छ मुंबई अभियान’ अंतर्गत मुंबईत स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या ‘क्लीन अप मार्शल’च्या संस्थांचे प्रतिनिधींबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या.या तक्रारींची गंभीर दखल घेत या प्रतिनिधींची सेवा खंडीत करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
त्यामुळे संबंधित ‘क्लीन अप मार्शल’ म्हणून नेमण्यात आलेले प्रतिनिधी आणि संबंधित संस्थांची सेवा 4 एप्रिल 2025 पासून खंडीत करण्यात येणार आहे. मुंबईकर नागरिकांनी याची नोंदी घ्यावी, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.4 एप्रिल 2025 नंतर या ‘क्लीन अप मार्शल’कडून दंड आकारणी होत असल्यास नागरिकांनी संबंधीत प्रशासकीय विभागाशी (वॉर्ड ऑफिस) संपर्क साधावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.