
एयु स्मॉल फायनान्स बँक तर्फे नाचणे जि. प. शाळा १ येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप
. रत्नागिरी : एयु स्मॉल फायनान्स बँक तर्फे नाचणे जिल्हा परिषद शाळा नंबर एक येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. तर बँकेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरमधे नाचणे ग्रामपंचायतचे सरपंच भैय्या भोंगले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आठले तसेच एयू स्मॉल फायनान्स बँकेचे ब्रांच मॅनेजर सतीश लिंगायत आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.