
राज्यपाल महोदयांनी १२ नामनियुक्त सदस्यांची यादी वर्षभरापासून दाबून ठेवली तीसुद्धा लोकशाहीची हत्याच नाही काय?, शिवसेनेचा सवाल
भाजपाच्या १२ आमदारांवर कारवाई केल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले.यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजपावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष प्रत्येक वेळी केंद्राची बाजू घेऊन राज्यातील मराठा, ओबीसी समाजाशी उभा दावा का मांडत आहे तेच कळत नाही. या दाव्यात त्यांनी स्वतःचे १२ आमदार एक वर्षासाठी गमावले. त्याला नाइलाज आहे. ही लोकशाहीची हत्या आहे, असे त्यांना वाटते, पण राज्यपाल महोदयांनी १२ नामनियुक्त सदस्यांची यादी वर्षभरापासून दाबून ठेवली तीसुद्धा लोकशाहीची हत्याच नाही काय?, असा सवाल शिवसेनेने केला आहे.
www.konkantoday.com