
सिंधुदुर्गातील महाविद्यालयीन विद्यार्थीनींचे व महिलांचे चोरुन आक्षेपार्ह छायाचित्र काढल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल
सिंधुदुर्गातील महाविद्यालयीन विद्यार्थीनींचे व महिलांचे चोरुन आक्षेपार्ह छायाचित्र काढल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
महाविद्यालयीन विद्यार्थीनींचे व महिलांचे चोरुन आक्षेपार्ह छायाचित्र काढल्याप्रकरणी कसाल गांगोची राई येथील नंदकुमार लक्ष्मण वनकर (वय ५०) याच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत ढोकमवाडी (ता.कुडाळ) येथील एका महिलेने तक्रार दाखल केली आहे.
कसाल बाजारपेठ येथे काल सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला आहे. फिर्याद देणाऱ्या महिलेने संबंधित महिलांचे छायाचित्र काढत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी याबाबत विचारणा केली असता ते तेथून पळून गेले. त्यानंतर याबाबत त्या महिलेने सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित वनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमती नागरगोजे या अधिक तपास करीत आहेत
www.konkantoday.com