
स्थानिक प्रकल्पग्रस्तांना खासदार विनायक राऊत यांनी दलालाचा दर्जा दिल्याने संताप
राजापूर तालुक्यातील विविध समाजघटकांतून रिफायनरी प्रकल्पाला जोरदार पाठिंबा वाढत असतानाच त्याकडे दुर्लक्ष करीत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. विनायक राऊत यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना प्र्रकल्प समर्थकांचा उल्लेख दलाल म्हणून केल्याने त्याविरूद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तालुक्यातील रोजगाराची आजही स्थिती लक्षात घेता एखाद्या प्रकल्पाचे समर्थन केले म्हणून जर आम्हाला दलाल संबोधले जाणे हे गैर असून आम्ही दलाल म्हणून सिद्ध झालो तर सांगाल ते ऐकू मात्र तुम्ही आम्हाला दलाल म्हणून सिद्ध करण्यात अपयशी ठरलात तर खासदारकीचा राजीनामा द्याल का? असे तगडे आव्हान राजापूर तालुका व्यापारी संघाचे सचिव विलास पेडणेकर यांनी दिले आहे.
www.konkantoday.com