
चिपळूणचा अभिनेता ओंकार भोजने कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित.
कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात पार पडलेल्या दिमाखदार सोहोळ्यात संस्थेच्यावतीने आपल्या दर्जेदार अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे मराठी सिनेसृष्टीतील तसेच टेलिव्हिजनवरील सध्या चर्चेत असलेले प्रेक्षकांचे लाडके कलाकार कोकण कोहिनूर ओंकार भोजने यांना या वर्षीचा कोकण संस्थेच्या राज्यस्तरीय कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सहकाराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला महाराष्ट्र राज्यात मानाचे स्थान निर्माण करून देणारे, तसेच जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येकाला जिल्हा बँकेशी जोडून त्यांना सरकारच्या परिघात आणणारे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांना सहकारातील कार्यासाठी कोकण रत्न तर रेणूताई दांडेकर यांना समाज गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी पद्मश्री राहीबाई पोपरे, हिरवळ ट्रस्टचे अध्यक्ष किशोर धारिया, लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका रेणूताई दांडेकर, आवाजाचे जादूगार आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक श्रीनिवास दिनकर तावडे आणि कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. www.konkantoday.com