
आधी नळपाणी योजना, मगच राज्यमार्गाचे काम करण्याचा निर्णय
भरण-दापोली राज्य महामार्गापैकी भरणे येथील तालुका कृष रोपवाटिकेसमोरील कॉंक्रिटीकरणाच्या कामास सुरूवात झाली आहे. अण्णाच्या पर्यापर्यंत कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यापुढील राज्य महामार्गाच्या कामात खोडा पडण्याची शक्यता आहे. शहरात ४२ कोटी रुपये खर्चुन राबवण्यात येणार्या योजनेचे प्राधान्याने काम हाती घेत ते पूर्ण झाल्यानंतरच राज्य महामार्गाचे काम हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय राज्य महामार्गाच्या कामात अण्णाच्या पर्यापास तीनबत्तीनाकापर्यंतच्या दुकानांचाही अडसर असल्याने नगरप्रशासनाची कोंडी झाली आहे.
www.konkantoday.com




