
रत्नागिरीत आता मद्याची होम डिलेव्हरी होण्याची शक्यता
राज्यात मद्याची दुकाने उघडल्यानंतर होणाऱ्या वाढत्या गर्दीमुळे शासनाने काही ठिकाणी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता.रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप मद्याची दुकाने उघडलेले नाहीत.रत्नागिरीत मद्याची होम डिलिव्हरी मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन विचार करीत आहे.ग्राहक फोन करून, व्हॉट्सअॅप किंवा गुगल लिंकद्वारे मद्याची ऑर्डर देऊ शकणार आहेत.ऑर्डर दिल्यानंतर त्याची आपल्याला होम डिलिव्हरी मिळणार आहे.अशा पद्धतीचा वापर केल्याने दुकानांसमोरील गर्दी पण टळू शकणार आहे आणि मद्याची विक्री झाल्याने शासनाला महसूलही मिळू शकणार आहे.अशा पद्धतीचा प्रयोग छत्तीसगडमध्ये झाला आहे.त्यामुळे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी अशा पद्धतीचा प्रयोग रत्नागिरीत राबवण्याच्या दृष्टीने प्रशासन विचार करीत असल्याचे सांगितले आहे.
www.konkantoday.com