
दापोलीत चाकरमान्यांचा वाढता ओघ पाहता प्रशासन सतर्क
दापाेली तालुक्यात दिवसेंदिवस चाकरमान्यांची संख्या वाढत असून कोरोना बाधितांचा आकडाही वाढत असल्याने दापोलीतील प्रशासन सतर्क झाले असून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.
तालुक्यात एकूण १४ कोरोना बाधित रूगांची संख्या झाली आहे. त्यामध्ये चाकरमानी वर्गाचा समावेश आहे. तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असणार्या चाकरमान्यांच्या संख्येमुळे प्रशासनावर जबाबदारी वाढली आहे. प्रत्येक गावात क्वारंटाईन कक्ष उभारण्यात आला असून त्याला स्थानिक पातळीवरच उभारी देण्याचे काम सुरू आहे.
तालुक्यात आलेल्या प्रत्येक चाकरमान्याची नोंद व्हावी यासाठी कोकण कृषि विद्यापीठाच्या शेतकरी भवनमध्ये आरोग्य तपासणी पथक तैनात करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आलेल्या प्रत्येक चाकरमान्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील चाकरमान्यांचा वाढता ओघ पाहता दापोली नगरपंचायतीतर्फे शहरातील बाजारपेठ शुक्रवार व शनिवार अशी दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. तसेच दापोली उपजिल्हा रूग्णालय, दापोली पोलिस ठाणे आदी चाकरमान्यांच्या रहदारीच्या ठिकाणी दापोली नगरपंचायतीतर्फे निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू आहे.
www.konkantoday.com