
व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 39 रुपयांनी वाढ.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केला आहे. 1 सप्टेंबरपासून मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 39 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.इंडियन आईलच्या वेबसाइटनुसार, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ 1 सप्टेंबरपासून लागू झाली आहे. तर मुंबईत त्याची किंमत 1644 रुपये झाली आहे. यापूर्वी हा सिलिंडर मुंबईत 1605 रुपयांना मिळत होता