
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे मुख्य पाईपलाईनची अवस्था बिकट
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करताना सलग दोन दिवस फुटलेल्या मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीचे शुक्रवारी काम करताना अनेक ठिकाणी गळती असल्याचे दिसून आले. त्यामुळे दुरुस्ती करताना कामगारांच्या नाकीदम आला असून यामुळे नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास काही दिवस लागणार आहेत अर्ध्या शहराला खेर्डी माळेवाडी येथे असलेल्या जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी खेर्डी दत्त मंदिर ते बायपास साठवण टाकी अशी मुख्य पाईपलाईन आहे. मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी खोदाई करताना बुधवार व गुरुवार असे सलग दोन दिवस मुख्य पाईपलाईन फुटली तिची शुक्रवारी दुरुस्ती करताना खोदाईच्याच कामामुळे अनेक ठिकाणी गळती लागल्याचे दिसून आले. त्यामुळे दुरुस्तीचे काम करणार्या महामार्ग तसेच नगर परिषद कामगारांच्या नाकीदम आला आहे. अनेक ठिकाणी गळती लागल्याने दुरुस्तीच्या कामाला आणखी काही दिवस लागणार आहेत.
त्यातच अजून कोणत्या ठिकाणी पाईपलाईन फुटली याचा शोधही नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रोहित खाडे कर्मचार्यांच्या माध्यमातून घेत आहेत. त्यामुळे बावशेवाडी, खंड कांगणेवाडी या भागांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार आहेत. सध्या मागणी करणार्या नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र असे असले तरी सध्या वाढलेल्या उष्म्यामुळे पिण्यासह अन्य कामांसाठी मोठ्याप्रमाणात पाणी लागत आहे. महामार्ग विभागाच्या हलगर्जीपणामुळे पाण्याला मुकावे लागत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.www.konkantoday.com