
रत्नागिरी पोलिसांनी उभ्या केलेल्या अत्याधुनिक सीसीटीव्ही कंट्रोल रूम मुळेरत्नागिरी शहर आता पोलिसांच्या नजरेत
रत्नागिरी पोलिसांनी उभ्या केलेल्या अत्याधुनिक सीसीटीव्ही कंट्रोल रूम मुळे
रत्नागिरी शहर आणि महत्वाच्या भाग पोलिसांच्या नजरेखाली आहे
एचडी, बुलेट, एएनपीआर अशा अत्याधुनिक ५७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे शहरामध्ये बसले आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूला नव्या इमारतीमध्ये त्याचे नियंत्रण कक्ष सुरू झाले आहे. अपघात, गुन्हेगारी, गैरप्रकार, बेशिस्त वाहनपार्किंग, वाहतुकीला होणारा अडथळा, अगदी दिवसा-रात्रीच्या बारीकसारीक हालचालींवर या नियंत्रण कक्षातून २४ तास पोलिसांचा वॉच शहरावर आहे.
राज्यातील औरंगाबाद शहरामध्ये सीसीटीव्हीचा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर रत्नागिरी शहरातही प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्हीचा हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या प्रयत्नातून हा १ कोटीचा प्रकल्प सुरू झाला आहे. यामध्ये शहरांतील सर्व प्रवेशद्वारांपासून सावर्जनिक ठिकाणे, महत्वाची ठिकाणे, किनारे, बंदर, जेटी, एसटी बसस्थानक, काही संवेदनशील भाग आदी ठिकाणी ५७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
ई-निविदा प्रक्रिया करून मुंबईतील कंपनीने या कामाचा ठेका घेतला आहे. हे काम पूर्ण झाले असून, या ५७ सीसीटीव्हीचे नियंत्रण पोलिस मुख्यालयातील नवीन इमारतीच्या कक्षात सुरू झाले आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यामध्ये पुढाकार घेऊन या कामाला गती दिली. पालकमंत्री उदय सामंत यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला आज हे काम पूर्ण झाले आहे. ५७ सीसीटीव्हीचे मॉनिटर नियंत्रण कक्षात आहेत. तेथील कर्मचारी २४ तास या सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण शहर आणि परिसरावर नजर ठेवून आहेत. कुठे अपघात झाला तरी कोणाची चूक आहे, हे कळते. संशयास्पद हालचाली, गुन्हेगारी, यावर पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे यामुळे शहरातील नागरिकांना एक प्रकारची सुरक्षिता लाभणार आहे
www.konkantoday.com