
रत्नागिरीच्या बॅडमिंटनपटू सरोज सावंत पोलंड येथील वर्ल्डमास्टर चॅम्पियनशीपसाठी रवाना
रत्नागिरी ः रत्नागिरीच्या प्रसिद्ध बॅडमिंटनपटू व प्रशिक्षक सरोज सावंत या पोलंड येथे होणार्या वल्डमास्टर बॅडमिंटन स्पर्धेसाठी रवाना झाल्या असून त्या ५० वर्षीय गटातून भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. दि. ४ ऑगस्ट ते १० ऑगस्ट रोजी या स्पर्धा पोलंड येथे होणार आहेत. नुकताच त्यांना खा. विनायक राऊत व शिवसेना उपनेते म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी बिपीन बंदरकर, राजू आराध्यमठ, संतोष कदम, सुधीर बाष्टे, अमोल भोसले, तेजश्री पिलणकर, श्वेता कवितके आदीजण हजर होते.
www.konkantoday.com




