
राजापूर शहरातील विकास कामांसाठी आ. साळवींच्या प्रयत्नाने पाच कोटींची मंजुरी
राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी शिफारस केलेल्या राजापूर न.प. हद्दीतील विकासकामांना विशेष अनुदान ठोक तरतूद लेखाशिर्ष अंतर्गत पाच कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. राजापूर शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा व शहराचा सर्वंकष विकासाचे ध्येय ठेवून आ. साळवी यांनी राजापूर न.प. हद्दीतील अधिकाधिक विकासकामांना निधीसह मंजुरी मिळावी म्हणून नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते. दरम्यान ना. शिंदे यांनी आ. साळवी यांच्या प्रस्तावाला अनुसरून विशेष अनुदान ठोक तरतुद लेखाशिर्ष अंतर्गत पाच कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याची माहिती आ. साळवी यांनी दिली.
www.konkantoday.com