
पर्यटकांसाठी गणपतीपुळे समुद्रकिनारा सुरूच राहणार
गणपती येथील समुद्रकिनार्यावर असलेल्या स्टॉलधारकांना ३१ पासून स्टॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मेरीटाईम बोर्डाच्या आदेशानुसार समुद्रकिनार्यावरील जलक्रीडा अर्थात वॉटर स्पोर्ट बंद झाले आहेत. येथील समुद्रकिनारा ही बंद राहणार की काय अशा स्वरूपाचा मेसेज सोशल मिडिया आणि इतर वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून प्रसारित झाला होता. परंतु हा गैरसमज चुकीचा असून गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटक व भाविकांसाठी पूर्णपणे सुरू राहणार असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.कुठलाही गैरसमज न करता गणपतीपुळे समुद्रकिनार्यावरील वाळूत असणारे स्पोर्ट व संपूर्ण समुद्रकिनारा पर्यटक व भाविकासांठी खुला राहणार आहे, असे स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. केवळ समुद्रकिनार्यावरील स्टॉलधारकांना ३१ मे पासून तसेच ३१ ऑगस्टपर्यंत वॉटरस्पोर्टना बंदीचे आदेश दिले आहेत. रविवारी वैशाख संकष्टी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळेत सुमारे ४० हजार भाविकांनी दर्शन घेतले. त्यासाठी संस्थान श्री देव गणपतीपुळे विश्वस्तांमार्फत सर्व खबरदारी व उत्तम व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मंदिरातील मुख्य पुजारी अमित प्रभाकर घनवटकर यांनी दिली. तसेच ३१ ऑगस्टपर्यंत जलक्रीडा बंद आहे. परंतु वाळूमधील स्पोर्ट व गणपतीपुळे समुद्रकिनारा सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.www.konkantoday.com