
२१ मजली इमारतीतील कार पार्किंग लिफ्ट कोसळून तरुणाचा मृत्यू
बोरिवली पश्चिम लिंक रोडवरील २१ मजली इमारतीतील कार पार्किंग लिफ्ट ७ मीटर खोल खड्ड्यात कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील ओम प्रथमेश इमारतीत सकाळच्या सुमारास घडली.मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, दोघेही कोसळलेल्या लिफ्टखाली अडकले होते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना बाहेर काढले. दोघांना बीडीबीए शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेदरम्यान, शुभम धुरी (३०) याला मृत घोषित करण्यात आले. तर सुजित यादव (४५) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. लिफ्ट कशामुळे कोसळली, याचा पोलिस तपास करत आहेत.