
अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी -भाजपा नेते किरीट सोमय्या
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नियमांची पायमल्ली करत अनिल परब यांनी शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम केलं. त्यामुळे त्यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी”, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी दापोली-मुरुड समुद्रकिनाऱ्यावर अनिल परब यांनी केलेल्या जमीन व्यवहाराची कागदपत्र देखील सादर केली असून त्यातल्या तरतुदींनुसार अनिल परब यांनी घोटाळा केला असल्याचा आरोप केला. तसेच, येत्या शुक्रवारी रत्नागिरीत जाऊन पोलीस तक्रार करणार असून सोमवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अनिल परब यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
www.konkantoday.com