
हर्णै बंदरात पुन्हा कोळंबीची आवक घटल्याने खवय्यांच्यात नाराजी तर व्यावसायिकांच्यात चिंता
कोळंबीची हर्णे बंदरातील आवक पुन्हा घटली आहे. नाताळ, थर्टीफस्टपूर्वीच कोळंबीचा तुटवडा निर्माण होत असल्याने व्यावसायिकांतून चिंता व्यक्त होत आहे.
हर्णै बंदरातील कोळंबीला नेहमीच मागणी असते. आवक वाढली की विक्रीला चालना मिळते आणि पर्यटकांचीही बंदरावर गर्दी वाढत असते. मात्र मागील महिन्यांपासून कोळंबीच आवक घटत असल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांसह पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. यामुळे किरकोळ स्वरूपात मिळणार्या कोळंबीचे दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
www.konkantoday.com




