गुरुपौर्णिमेनिमित्त गोदुताई जांभेकर महिला विद्यालयात शिक्षकांचा सत्कार व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप


गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहरतर्फे गोदुताई जांभेकर महिला विद्यालयात एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात आला, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन गणवेशांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन भाजप शहराध्यक्ष मा. दादा ढेकणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला
राजू भाटलेकर, मनोज पाटणकर, अमित विलनकर, नितीन जाधव, संदीप सुर्वे, निलेश आखाडे, सत्यवती बोरकर, मनाली राणे, प्रज्ञा टाकळे, समीर वस्ता, नितीन गांगण, प्रीती शिंदे, वैभवी शिवलकर, मधुरा ढेकणे, विनय मसुरकर, संतोष सावंत, सचिन गांधी, भालचंद्र विलनकर, मंदार भोळे,राणे, तुषार देसाई, प्रवीण ढेकणे आदींची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे शिक्षक व शिक्षिका यांचा पुष्पगुच्छ, अहिल्याबाई होळकर यांचे पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. शिक्षकांनी व्यक्त केलेल्या भावना मनाला भिडणाऱ्या होत्या. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता.

महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे यांनी आपले मनोगत व्यक्त करत, “शिक्षक हा विद्यार्थ्याचा खरा गुरू असून समाजाच्या घडणीत त्यांचे योगदान अमूल्य आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचे स्मरण व सन्मान होणे हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे,” असे मत मांडले.
शाळेच्या शिक्षिका सौ. स्नेहल पावरी म्हणाल्या –
“गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकांचा अशा प्रकारे गौरव होणं, ही अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार. हा सन्मान आमच्यासाठी मोठं बळ देणारा आहे.”
भारतीय जनता पार्टी शहरतर्फे हा उपक्रम दरवर्षी अधिक मोठ्या प्रमाणात राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button