
खेडमध्ये 12 जुलैला रक्तदान शिबिर
कोरोना महामारी संसर्गाच्या गंभीर परिस्थितीचा सामना करत असताना आवश्यक असणारा रक्त पुरवठा लक्षात घेऊन 12 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन खेड येथे करण्यात आले आहे. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हे शिबिर होईल. 12 रोजी सकाळी 9:30 वा. शिबिराला प्रारंभ होणार आहे. खेड तालुक्यातील रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब खेड अध्यक्ष संदीप नायकवडी, सेक्रेटरी डॉ वरुण मोदी, खजिनदार आदित्य गांधी यांनी केले आहे.
www.konkantoday.com