
भाजपच्या वतीने रत्नागिरीत शहरातील खड्डे बुजवण्याची मोहीम ,महिला कार्यकर्त्याही उतरल्या रस्त्यावर
रत्नागिरी– शहरामध्ये रस्त्यांची स्थिती दयनीय झाल्यामुळे आणि नगरपरिषदेने खड्डे न बुजवल्यामुळे आजअखेर सकाळी भाजप जिल्हाध्यक्ष अँड. दीपक पटवर्धन आणि भाजयुमो द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, युवा नेते अनिकेत पटवर्धन व शहराध्यक्ष सचिन करमरकर, भाजयुमो शहराध्यक्ष विक्रम जैन यांच्या नेतृत्वाखाली खड्डे भरण्यात आले. भर पावसातही शहरात विविध ठिकाणी खड्डे भरण्याचे काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले. त्यामुळे वाहनचालकांनी भाजपाचे आभार मानले. नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावर आसूड ओढताना खड्ड्यांमुळे वाहनांचे प्रचंड नुकसान आता तरी थांबेल, अशा प्रतिक्रिया वाहनचालकांनी व्यक्त केल्या.
या वेळी भाजप शहराध्यक्ष सचिन करमरकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, महिला मोर्चा सरचिटणीस शिल्पा मराठे, ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रुमडे, नगरसेविका प्रणाली रायकर, मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ, भाजयुमो शहराध्यक्ष विक्रम जैन, नंदू चव्हाण, प्रवीण देसाई, भाई जठार, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, नगरसेवक राजेश तोडणकर, धनंजय पाथरे, हर्षद घोसाळकर, राजन फाळके, राजू किर, अमित चव्हाण, संजय पुनस्कर, राजू भाटलेकर आणि अनिकेत पटवर्धन उपस्थित होते.
मारुती मंदिरसह शहरामध्ये आठवडा बाजार, हॉटेल मिथीलानजिक आदी ठिकाणी खड्डे भरण्यात आले आहेत. या वेळी नागरिकांनीही प्रतिसाद देत खड्डे भरण्यास सहकार्य केले. लोकांच्या मनामध्ये नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांबद्दल नाराजी आहे. खड्डे भरण्याबाबत नगरपरिषदेने कोणताही निर्णय घेतला नाही. मंत्री, नगराध्यक्षांची गुळगुळीत रस्त्यांची आश्वासने हवेत विरली व आता खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान, कंबरदुखीने जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे भाजपने पुढाकार घेत खड्डे बुजवले आहेत.
www.konkantoday.com