
युतीची सत्ता येऊन मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच राहणार-आमदार प्रसाद लाड
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सेना युतीची सत्ता येणार असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच राहणार असल्याचे ठाम मत आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केले.
सध्या भारतीय जनता पक्षात व शिवसेनेकडे अन्य पक्षातून नेते येण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीला पूर्णपणे यश मिळणार आहे.महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांची युती भक्कम आहे.यामुळे युतीचा विजय निश्चित असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी परत एकदा देवेंद्र फडणवीसच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांचे कुटुंबीय भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहे. त्याचे स्वागतच करू या बाबतीत वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेण्यात येणार आहे. राणे यांच्या प्रवेशामुळे स्थानिक भाजप नेते नाराज होणार नाहीत त्या सर्वांना विश्वासात घेतले जाणार आहे. राणे यांना भाजपमध्ये घेताना वरिष्ठ पातळीवरून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना देखील विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाणार असल्याने शिवसेनेच्या नाराजीचाही प्रश्न येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com