
हावडा-मुंबई एक्स्प्रेसचा भीषण अपघात,18 डब्बे रुळावरून घसरले
प्रवासी गाढ झोपेत असताना हावडा-मुंबई एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. हावडा एक्स्प्रेसचे तब्बल 18 डब्बे रुळावरून घसरले. झारखंडमध्ये पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात झाला.हावडा मुंबई मेल एक्सप्रेसला झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे विभागातील बारांबो रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला आहे. रेल्वेचे 18 डबे रुळावरून घसरल्याची माहिती समोर आली आहे.सध्या या अपघातात 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसह एआरएम, एडीआरएम आणि सीकेपीचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.एसईआरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “मुंबई-हावडा मेलचे अनेक डबे बाराबांबोजवळ रुळावरून घसरले. अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर बारांबो येथे प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. आता त्यांना पुढील उपचारांसाठी चक्रधरपूरला नेण्यात आले आहे. मदतकार्य अजूनही सुरूच आहे.”www.konkantoday.com