
तब्बल सतरा वर्षे अंगारकीला गणपतीपुळ्याला पायी येणारा गणेशभक्त
देवावर श्रद्धा असेल तर भक्त त्यासाठी काहीही करण्यास तयार असतात कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी सरूड येथील राहणारा सुभाष कुंभार हा गणेश भक्त आहे गणपतीपुळे येथील गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गेली सतरा वष्रे अंगारकीला गणपतीपुळ्याला पायी चालत येत आहे गणपतीपुळे हे एक शे पंचवीस किलोमीटरचे अंतर आहे हे अंतर पार करण्यासाठी त्याला दोन दिवस लागतात २०१५ साली अंगारकी संकष्टी ला सुभाष कुंभार याने प्रथम गणपतीपुळे येथील श्रीगणेशाच्या दर्शनाला पायी जाण्याचा निर्धार जाहीर केला आणि गेली सतरा वर्षे त्यांनी ही परंपरा सुरू ठेवली आहे
सूरुड जि. कोल्हापूर ते गणपतीपुळे रत्नागिरी पर्यंत गेली १७ वर्षे प्रत्येक अंगारकी चतुर्थीनिमित्त चालत येणारे श्री सुभाष कुंभार रत्नागिरीत आले असता त्यांना रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मित्रमंडळा तर्फे
सन्मान शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व श्री रत्नागिरीचा राजा ची फोटो फ्रेम देवून गौरविण्यात आले. यावेळी श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मित्रमंडळ चे श्री. मृत्युंजय उर्फ लाल्या खातू, दिपक पवार, निमेश नायर, संतोष कदम, अभिजित गोडबोले, अमरेश पावसकर, आनंद बंदरकर, अभिजीत दुडे, दिनेश वर्मा, अझीम चिकटे, स्वप्नील सावंत, अथांग कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday.com