
शिवसेनेकडून मिशन पुणे ; मंत्री उदय सामंत यांनी घेतल्या नाराजांच्या भेटी
पक्षाची ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेने मिशन पुणे हाती घेत नाराजांना आपल्याकडे वळविण्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शनिवारी (दि. १) उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी कोथरूड विधानसभेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या निवासस्थांनी जाऊन भेट घेतली.त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली. माजी आमदार महादेव बाबर त्यानंतर चंद्रकांत मोकाटे यांनी भेट घेतल्यामुळे मिशन पुणेमध्ये शिवसेनेकडून उध्दव ठाकरे यांचा पक्षातील आमदार आणि पदाधिकारी टार्गेट केले जात असल्याचे दिसून येते.
पुणे शहरात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी शिवसेना शहरप्रमुखांसह आमदार, मंत्रीमहोदयांकडून फिल्डिंग लावली जात आहे. त्यात नाराज आणि इच्छुक व्यक्तींना आपल्याकडे कसे घेता येईल, याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी यांना टार्गेट केले जात आहे