माझ्याकडे असलेली बंदूक ही वारसाने प्राप्त झालेली -मंत्री दीपक केसरकर


माझ्याकडे कोणतीही बंदुक नाही. माझ्या वडिलांच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे २ बंदुकांचा परवाना होता. त्यातील १ बंदुक ही वारसाने मला प्राप्त झाली आहे. निवडणूक काळात वेळोवेळी ही बंदुक प्रशासनाकडे जमा केली जाते.मात्र केवळ तेरा जणांना नोटीस काढणे, असे म्हणणे जनतेची दिशाभूल करणारे असून जिल्हा प्रशासनाने सर्व शस्त्रधारकांना याबाबत नोटीसा बजाविल्या असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या नोटीशीत जामिनावर मुक्त झालेला, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला, दंगलीत समाविष्ठ असलेला व्यक्ति असा उल्लेख आहे. मात्र, त्यापैकी कोणत्याही स्वरुपाचा आरोप माझ्यावर नाही. त्यामुळेच केवळ शस्त्राचा परवाना असल्याने अशाप्रकारची बदनामी होणे चुकीचे आहे, असेही मंत्री केसरकर यांनी म्हटले आहे.

मंत्री केसरकर यांनी याबाबत प्रसिध्दी पत्र देऊन बाजू स्पष्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, माझ्याकडे कुठल्याही प्रकारची बंदुक नाही, वडिलांच्या कालावधीत त्यांच्याकडे दोन बंदुकांचा परवाना होता. त्यातील एक बंदूक ही वारसाने प्राप्त झाली व एक बंदूक माझ्या वडील बंधूंना प्राप्त झाली. वडिलांची आठवण म्हणून ही शस्त्रात्रे आजही पुजण्यासाठी आम्ही वापरतो. गेल्या पन्नास वर्षांत त्या शस्त्रांचा वापर झाला नाही
Www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button