
थकित वेतनामुळे सफाई कर्मचार्यार्यांचे कामबंद आंदोलन, मुख्याधिकारी यांच्या मध्यस्थीनंतर मागे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कर्मचार्यांनी बुधवारी भल्या सकाळी संप पुकारल्याने शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दोन महिने वेतन न मिळाल्याने ही भूमिका कामगारांनी घघेतली होती. मात्र, संबंधित ठेकेदार आणि मुख्याधिकार्यांनी चर्चा केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.दररोज भल्या पहाटे रत्नागिरी शहराची स्वच्छता करणार्या रत्नागिरी नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी बुधवार दि. २५ रोजी सकाळी अचानक काम बंद आंदोलन पुकारले कामावर जाण्यासाठी जयस्तंभ येथे आलेल्या कर्मचार्यांनी काम करण्यास नकार दिला. त्यामुळे शहरात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला.www.konkantoday.com