
कंत्राटदार कंपनीच्या अर्धवट कामामुळे यंदाच्या पावसात धामणी ते बावनदीपर्यंतचा प्रवास खडतर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्र म्हणून समजल्या जाणार्या आरवली ते बावनदीपर्यंतच्या विविध भागात ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे पावसाळ्यातील प्रवास खडतर बनला आहे. आवश्यक त्या उपाययोजना न केल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. दरडी कोसळण्याच्या धोक्यामुळे महामार्ग बंद पडण्याची भीती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.महामार्गावर वांद्रीनजिक डोंगराची खोदाई करताना त्याला टप्पे न दिल्याने या ठिकाणी गतवर्षी माती रस्त्यावर आली होती. यावर्षी पहिल्याच पावसात मातीचा भला मोठा ढीग आणि मोठे दगड रस्त्यावर आल्याने मार्ग बंद पडला. या ठिकाणी ठेकेदार कंपनीने सद्यस्थितीत एकेरी मार्ग सुरू ठेवला आहे.www.konkantoday.com