
मुंबई मधून आलेले जोडपे क्वारंटाइन न हाेताच निघून गेले ,गुन्हा दाखल
मुंबईतून जे काही चाकरमानी वेगवेगळ्या कारणाने रत्नागिरी जिल्ह्यात येत आहेत त्यांची कशेडी येथील चेक नाक्यावर तपासणी करण्यात येत आहे व त्यांना खेड परिसरात क्वारंटाइन करून ठेवण्यात येत आहे रत्नागिरी काळबादेवी येथे राहणारे व सध्या मुंबई भांडुप ते असणारे एक जोडपे आपल्या दीड वर्षांच्या बाळासह मुंबई भांडूप येथून आले त्यांना खेड येथील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासण्यात आले त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना इन्स्टुट्युन काेराेन्टाईन होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले परंतु वैद्यकीय अधिकाऱयांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून हे जोडपे तेथून निघून गेले त्यांच्या या कृतीमुळे समाजात कोरोना सारखी साथ पसरण्याची शक्यता असल्याने त्यांच्या विरोधात कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर अंजली विटेकर यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी या जोडप्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com