
आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित जिल्ह्यातील सर्व विधानसभा लढविणार
आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पक्ष रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जागा लढविणार असून बहुजन समाजातील लोकप्रतिनिधींना उमेदवारी दिली जाणार आहे, यासाठी पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पक्ष येथील प्रस्थापितांना जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती वंचितचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांनी दिली. स्वतः जाधव तसेच दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष असे दोन जिल्हाध्यक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.श्री. जाधव पुढे म्हणाले की, वंचितकडून राज्यातील सर्व जागा लढविण्यासाठी चाचपणी सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातदेखील दोन दोन टर्म आमदारकी भोगणारे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे वंचितकडून या प्रस्थापितांना धक्का देण्याबरोबरच जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व जागा लढविण्याचा निर्धार वंचितच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. यासाठी जिल्ह्यातील बहुजन चेहर्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. याची चाचपणीदेखील पूर्ण झाली असून दोन जिल्हाध्यक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव स्वतः गुहागर विधानसभा लढविणार असून दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष उपेंद्र जाधव चिपळूण-संगमेश्वर विधानसभा लढविणार असल्याची माहिती श्री. जाधव यांनी दिली. www.konkantoday.com