
महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा धुमाकूळ
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, बामणोली, कास या भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसाने संपूर्ण शहारतच हाहाकार उडाला आहे.महाबळेश्वर तालुक्यातील मोळेश्वर आणि कुरोशी गावातील घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. तर महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड खाली आल्याने हा रस्ता खचला आहे.
पश्चिम महाराष्ट्राचे आकर्षण आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपले आहे. महाबळेश्वरला मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोळ्याशी जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावर आज सकाळी एक मोठी दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या आपत्तीमध्ये रस्त्याचा मोठा भाग अक्षरशः वाहून गेला असून, दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांची मोठी गैरसोय झाली आहे.