
डेरवण रुग्णालयात शस्त्रक्रिया कार्यशाळा
डेरवण वालावलकर रुग्णालयाच्या कान, नाक, घसा विभागाच्या वतीने दुर्बिणीद्वारे सायनस सर्जरी कॅडेव्हेरिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत १८ कान, नाक, घसा, सर्जनना सायनस शस्त्रक्रिया अद्ययावत प्रशिक्षण तज्ञ डॉक्टरांकडून देण्यात आले. प्रशिक्षणात कान, नाक, घसा सर्जननी १० कॅडेव्हेरिक बॉडीजवर सर्जरी करून सायनस शस्त्रक्रियांमध्ये निपुणता मिळवली. प्रशिक्षणात मुंबई, पुणे, सांगली, मिरज, नांदेड, रत्नागिरी येथील सर्जनना मुंबई येथील डॉ. राजेश यादव, डॉ. शशिकांत मशाल, डॉ. तृप्ती गडकरी, पुण्याचे डॉ. प्रसून मिश्रा, डॉ. परेश चव्हाण, सांगली येथील डॉ. सचिन निलाखे या तज्ञांनी प्रशिक्षण दिले.
शिबिरासाठी एंडोस्कोपिक सिस्टिम, कॅमेरा, दुर्बिणी, डेब्रीडर, ड्रील अशी अद्यावत मशिनरी वालावलकर रुग्णालयात उपलब्ध असल्याने प्रशिक्षण सुलभ झाले. रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील शरीरशास्त्र विभाग प्राध्यापक डॉ. प्रशांत मूल्या यांनी महाराष्ट्रात कुठेही उपलब्ध नसलेले कॅडॅव्हर्स उपलब्ध करुन दिले. सॉफ्ट एम्बलबेड कॅडॅव्हर शजे एक विशिष्ट द्रावण वापरल्यामुळे मऊ राहते आणि ज्यामुळे सर्जन्सला शिकायला सोपे जात होते. यशस्वीतेसाठी डॉ. सजीव केणी आणि डॉ. प्रतिक शहाणे आदींनी प्रयत्न केले.www.konkantoday.com