
मतदारराजा जागो हो, लोकशाहीचा धागा हो, रत्नागिरी नगर परिषदेचा उपक्रम
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी या निवडणुकीत १०० टक्के मतदान करावे यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा लोकसभा निवडणूक २०२४ टीमचे जिल्हा सहाय्यक नोडल अधिकारी (शहरी) तुषार बाबर यांनी जनजागृती मोहिमे अंतर्गत रत्नागिरी नगर परिषद पथनाट्याचे आयोजन केले होते.या पथनाट्यामध्ये १८ वर्षावरील व मतदार यादीत नोंद असलेल्या नागरिकांनी मतदान करावे, तसेच दिव्यांग व नागरिक यांच्यासाठी निवडणूक आयोगाने यावर्षी घरबसल्या मतदानासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहेत.www.konkantoday.com