
शाळकरी मुलीच्या छेडछाड प्रकरणी आराेप असलेल्या आराेपीला जामीन मंजूर.
रत्नागिरी शहर परिसरात शाळकरी मुलीची छेडछाड प्रकरणी अटक करण्यात आलेला आराेपी माेहसीन नदाफ या तरूणाला न्यायालयाने 25 हजारच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. आराेपी माेहसीन नदाफ याने या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेडछाड करत हाेता. याबाबत मुलीच्या वडिलांनी 5 जुलैला आराेपीला जाब विचारण्यासाठी त्याचे घर गाठले असता आराेपीने वेगाने कार चालवत तेथून पळ काढला. वेगाने कार चालवत त्याने अन्य काही वाहनांचेही नुकसान केले हाेते. याप्रकरणी ग्रामीण पाेलिसांनी आराेपीविरूद्ध गुन्हा दाखल केला हाेता. आराेपीने जामीनासाठी अर्ज दाखल केला हाेता. त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला. आराेपीच्यावतीने अॅड. सुहेल शेख यांनी काम पाहिले.www.konkantoday.com