
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या रविवारी (ता. १८) लाडक्या बहिणींशी ऑनलाईन संवाद साधणार
महायुती सरकारची लाडकी बहिण योजना राज्यात सुरू झाली असून पहिले दोन हप्ते खात्यात जमा झाले आहे. यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या रविवारी (ता. १८) लाडक्या बहिणींशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम दि यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी ४ वाजता होणार असल्याची माहिती विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित केला असून यात महिला बचत गट, लाभार्थी महिला, सामाजिक कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत.