
खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील स्पेक्टर केमिकल प्रा. लि. या रासायनिक कंपनीला आग, लाखाेचे नुकसान
खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील स्पेक्टर केमिकल प्रा. लि. या रासायनिक कंपनीला आग लागून लाखाेचे नुकसान झाल्याची घटना साेमवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या दरम्यान घडली.आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, तब्बल दोन तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.
लाेटेतील स्पेक्टर केमिकल कंपनी साेमवार असल्याने बंद हाेती. तसेच सोमवार असल्याने महावितरणचा विद्युत पुरवठाही बंद होता. मात्र, कंपनीबाहेर उघड्यावर असणाऱ्या रासायनिक ड्रममधील पदार्थाने अचानक पेट घेतला. त्यानंतर बाजूच्या सर्वच ड्रमना आगीचा वेढा पडला आणि क्षणार्थात आगीने राैद्ररूप घेतले. ऑक्टोबर हिटमुळे रसायनाने पेट घेतला असावा असा अंदाज व्यक्त केला गेला.
आगीचे वृत्त कळताच वसाहतीतील अग्निशमन दल, खेड नगर परिषदेचा बंब, परिसरातील खासगी पाण्याचे टँकर यांच्या मदतीने दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले
www.konkantoday.com