
लोटे औद्योगिक वसाहतीत दोन दुचाकींची धडक
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यावर एक्सल फाटा ते घरडा कॉलनीकडे जाणा-या रोडवर क्रॉयोगॅस कंपनीच्या पुढील बाजूस दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी
३.४५ वाजता दोन दुचाकींची समोरसमोर धडक झाली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून पोलिसांनी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, होन्डा ड्रीम युगा मोटार सायकल (क्र एम.एच०८/ए.व्ही/७४७६) व
घेऊन नितीन रामचंद्र काणेकर हा दि. ३१ रोजी पिरलोटे येथे सुतारकामासाठी एक्सल फाटा ते घरडा कॉलनीकडे आपल्या बाजूने जात होता. ३.४५ वाजण्याच्या सुमारास क्रायोगॅस कपंनीच्या पुढे त्याची दुचाकी आली असता घरडा कॉलनीकडून युनिकॉर्न मोटार (एम.एच ०८/ए/१३७) भरधाव वेगाने आली. त्यावर स्वार धनंजय शिवपाल सिंग याने भरधाव वेगात दुचाकी चालवून समोरून येणा-या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये धनंजय शिवपाल सिंग व नितीन रामचंद्र काणेकर (वय – ३३, रा. दाभीळ बाजारवाडी,
ता. खेड, जि. रत्नागिरी) हे जखमी झाले. दोन्ही मोटारसायकलचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती पोलिस हवालदार उदय संभाजी भोसले यांनी पोलिस ठाण्यात दिली असून धनजंय शिवपाल सिंग (वय-
३६,रा. घाणेकुट लोटे ता. खेड, जि. रत्नागिरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.