
उत्तर प्रदेशात काल एकाच दिवशी तब्बल तब्बल १०० कोटींची दारूची विक्री
देशातल्या तिसऱ्या टप्प्यातल्या लॉकडाऊन काळात अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काही नियम शिथील करण्यात आले आहे. शिथील केलेल्या नियमांमध्ये झोननुसार दारूची दुकाने उघडी ठेवण्याला परवानगी देण्यात आलेली आहे. काल एका दिवसात उत्तर प्रदेशातल्या योगी सरकारची तिजोरी मद्यपींनी मालामाल करून टाकली आहे.
उत्तर प्रदेशात काल एकाच दिवशी तब्बल २६हजार दारूच्या दुकांनामधून लोकांनी तब्बल १०० कोटींची दारू विकत घेतली. उत्तर प्रदेशात दरदिवशी ७० ते ८० कोटी रूपयांची दारूविक्री होत असते.
कर्नाटकात तर मद्यप्रेमीनी दारु खरेदीचा नवा विक्रम केल्याचं चित्र आहे. कर्नाटकात काल एका दिवसात दारुची विक्रमी विक्री झाली आहे. काल दिवसभरात तब्बल ४५ कोटींची मद्यविक्री कर्नाटकात झाली, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली.
www.konkantoday.com