
रत्नागिरी शहराची नवी पाणी योजना नव्हे तर तुकडे जोड पाईप योजना
रत्नागिरी शहरासाठी कोट्यावधी रुपये खर्चून टाकण्यात आलेली नवी पाणी योजना अद्याप पूर्णत्वाला गेली नसतानाच या योजनेचे पाईप वारंवार फुटत आहेत या पाईपलाईनच्या कामाबाबत व त्याच्या दर्जाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले गेले परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही त्यामुळे शासनाने ही शहरासाठी आणलेली नवीन पाणी योजना नसून तुकडे पाईप योजना ठरत आहे ही पाईपलाईन घातल्यापासून अनेक ठिकाणी त्याला प्रत्येक वेळी जोड देण्यात आलेला आहे त्यामुळे संपूर्ण शहरात ही पाईप योजना तुकडे जोडत जोडतच फिरली आहे सुरुवातीला प्रेशर असल्यामुळे पाईप फुटत असल्याचे कारण सांगितले गेले त्यानंतर नगर परिषदेने त्यावर कार्यवाही केली तरी पाईप फुटायचे थांबत नाहीत आठ दिवसांपूर्वी शहरातील नगरपरिषदेसमोरील बी अँड सी कार्यालयासमोर पाणी योजनेचे पाईप फुटले यापूर्वी या ठिकाणी चार ते पाच वेळा पाईपलाईन फुटली होती आठ दिवसांपूर्वी फुटलेला पाईप तुकडा टाकून जोडण्यात आला होता त्याचे काम करून झाले नाही तोच आता परत आज पाईपलाईन फुटली आहे त्याचे काम चालू असतानाच आंबेडकर पुतळ्याजवळ देखील पाईपलाईन फुटली आहे त्यामुळे पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी नगर परिषदेला आता कायमस्वरूपी कर्मचारी वर्ग नेमण्याची नामुष्की येण्याची वेळ आली आहे मध्यंतरी या पाईपलाईनच्या श्रेयवादावरून वाद सुरू झाला होता मात्र सतत फुटत असलेल्या या पाईपलाईनचे श्रेय कुणाला द्यायचे असा नागरिकांना प्रश्न पडला आहे
www.konkantoday.com
