
भास्कर जाधव हे राज्याचे नेतेत्यांच्यावर बोलण्याइतका मी मोठा नाही- शेखर निकम यांचा टोला
आमदार भास्कर जाधव हे राज्याचे नेते आहेत.त्यांच्यावर बोलण्याइतका मी मोठा नाही. चिपळूणमधील उमेदवारी आपल्याला मिळेल की नाही, ते माहिती नाही; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार जो उमेदवार देतील, त्या उमेदवारासमोर कोणताही उमेदवार असला तरी आम्ही त्याला भिडणार, अशा शब्दांत आमदार शेखर निकम यांनी आपले इरादे स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी महायुतीत समन्वय ठेवण्यासाठी समितीची स्थापना होणार असल्याचेही संकेतही दिले. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेचे नेते व आमदार भास्कर जाधव गुहागरऐवजी चिपळूण मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यातच जाधव यांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जिल्ह्यात चिपळूणसह पाचही जागांवर शिवसेनेचा भगवा फडकवू, असे जाहीर केले होते
www.konkantoday.com