
नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांनी माफी मागावी- मंत्री सुनील केदार यांची मागणी
काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या मुद्यावरुन दोन गट पडल्याचे चित्र आहे. काही ज्येष्ठ नेत्यांनी सामूहिक नेतृत्वाची मागणी करणारे पत्र पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवले. त्यानंतर गांधी कुटुंबाशी निष्ठावान असलेले नेते सक्रिय झाले आहेत. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनवण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आणि दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी, सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रामध्ये राज्यातील ज्या नेत्यांची नावे आहेत, त्यांच्यावर अत्यंत कडवट शब्दात टीका केली आहे.काँग्रेस अध्यक्ष म्हणून आदरणीय सोनिया गांधीजी यांना माझा मन:पूर्वक पाठिंबा आहे. गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे. आपल्या कृतीबद्दल या नेत्यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे” असे सुनिल केदार यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
www.konkantoday.com