
जिल्हा कोषागार कार्यालयातील दिरंगाईतून वेतन धारकांची कुचंबणा
रत्नागिरी जिल्हा कोषागार कार्यालयात सेवा निवृत्तांचे वेतन,वेतनातील नवीन फरक,नव्याने निवृत्त धारकांची देय वेतने, यासह विविध कार्यालयातील कंत्राटी आणि हंगामी कर्मचाऱ्यांची देयकांवर कारवाई करण्यात दिरंगाई झाल्याची तक्रार येत असून यामुळे सबंधितात नाराजी पसरली असल्याचे वृत्त आहे. याबाबत सबंधितांनी दिलेल्या माहिती वरुन या कार्यालयात विविध विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांना अनेक महिने लोटूनही पेन्शन सुरु झालेली नाही.तसेच मासिक वेतन देयकांबाबत वेळ होत असल्याने काही राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचे मासिक वेतन पुढील महिन्याच्या शेवटी शेवटी मिळत आहे. काहींनी याबाबतीत सबंधित कार्यालयात भेटावे लागते असे सांगून ते शक्य न झाल्यास कार्यालयीन पगार पत्रके बनविणा-यांच्या मार्फत संपर्क साधावा लागतो.असे सांगितले.हे शक्य न झाल्यास सदरील देयके लांबणीवर पडतात.किंवा दुर्लक्ष केले जाते असे सांगितले. याबाबत सबंधित कर्मचाऱ्यांनी 'नागरिकांची सनद' या कार्यालयाला नाही का ? असा सवाल व्यक्त करुन याविषयी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.
www.konkantoday.com