
सिंधुदुर्ग मालवण येथे पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या रॉक गार्डनमध्ये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार
सिंधुदुर्ग मालवण येथे पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या रॉक गार्डनमध्ये म्युझिक फाउंटन बसविण्यात आल्याने गार्डनमध्ये पर्यटकांची गर्दी वाढत आहे. गार्डनच्या देखरेखीवर खर्चही वाढत असल्याने आता गार्डनमध्ये प्रवेश कर आकारण्यात येणार आहे. पालिकेच्या ऑनलाईन सभेत हा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यात प्रत्येकी पाच रुपये कर घेण्याचे निश्चित करण्यात आले असून यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार असल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले.
www.konkantoday.com