
कोरोनामुक्त रुग्णाचे पुष्पवृष्टीने केले स्वागत,स्थानिक रहिवाशांचा स्तुत्य उपक्रम
कोरोनावर मात करणारा रुग्ण घरी येताना सोसायटी परिसरात त्याच्यावर पुष्पवृष्टी व औक्षण करून स्वागत करण्याचा आगळावेगळा व स्तुत्य उपक्रम उपक्रम आज २८ जुलै रोजी दुपारी रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप परिसरात राबवण्यात आला. स्थानिक रहिवाशांनी या रुग्णाचे स्वागत करत ‘कोरोनाला घाबरू नका, तर त्यावर मात करता येते’ असा सकारात्मक संदेश समाजाला दिला.
चीनमधील वुहामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले. त्यानंतर जगभरात कोरोनाने कहर सुरू केला. अगदी रत्नागिरी शहर, तालुक्यात आणि जिल्ह्यातसुद्धा कोरोनाचे हजारो रुग्ण आता सापडू लागले आहेत. मात्र तेवढ्याच संख्येने दररोज रुग्ण कोरोनावर मात करून आपापल्या घरी जात आहेत. अशाच एका रुग्णाचे निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळणार असल्याने स्थानिक रहिवाशांनी या रुग्णाचे आनंदाने स्वागत करण्याचे ठरवले. दुपारी त्यांचे जोरदार स्वागत पुष्पवृष्टी व औक्षण करून आणि टाळ्या वाजवून करण्यात आले.
या उपक्रमात रुग्णाच्या घरातील मंडळी, नातेवाईक, डॉ. श्रीनिवास कुंभारे, डॉ. अभय धुळप, मेधा कुळकर्णी, शिल्पा मराठे, पमू पाटील, ऋतूजा कुळकर्णी, नगरसेवक उमेश कुळकर्णी, परिसरातील मंडळी उमाकांत सनगर, राजू केणी, किशोर मालगुंडकर, केतन सनगर, मंजुषा बूंधाळे, जर्नादन पुनसकर यांनी स्वागत केले.
याप्रसंगी डॉ. कुंभारे यांनी सांगितले की, कोरोना बरा होतो घाबरून जावू नये. वेळीच वैद्यकीय उपचार घेऊन यावर मात करता येते.
www.konkantoday.com